एमव्हीपी लॉ कॉलेजची विद्यार्थिनी अर्चना जाधव यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव!

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विधी महाविद्यालयाची  विद्यार्थिनी अर्चना जाधव यांना कौशल्य विकास व उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल ५ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात मा. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

शिक्षक दिनानिमित्त आयोजित या विशेष सोहळ्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे हा सन्मान करण्यात आला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.

आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी अर्चना जाधव यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल MVP Law College परिवार आणि सर्व शिक्षकांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!